Sunil Balasaheb Dhumal
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत.
राहुल गांधी यांना 2019 प्रमाणे अमेठीतूनही उमेदवारी मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शशी थरूर तिरुअनंतपुरम येथून लढणार आहेत. येथून ते गत तीन टर्म खासदार राहिलेले आहेत.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काँग्रेसने आता लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.
बघेल हे छत्तीसगडमधील राजनांदगावमधून निवडणूक लढवणार आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी वेणुगोपाल हे केरळमधील अलापुझ्झा येथून निवडणूक लढवणार आहेत. येथून ते 2009 मध्ये जिंकले होते.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश यांना बंगळुरू ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
R