Radhika Khera : कोण आहेत काँग्रेस नेत्यांवर गैरवर्तनाचे गंभीर आरोप करणाऱ्या राधिका खेडा?

Rajanand More

राधिका खेडा

काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक, राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेडा यांनी रविवारी पक्षाला रामराम ठोकला.

Radhika Khera | Sarkarnama

22 वर्षे पक्षात

सुमारे 22 वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम. 'एनएसयूआय'पासून राजकीय कारकीर्द सुरू. विविध पदांवर केले काम.

Radhika Khera | Sarkarnama

श्रीरामाचे दर्शन घेतले अन्...

आईसोबत अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हापासून काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने अपमानित केले जात असल्याचे खेडा यांचे आरोप.

Radhika Khera | Sarkarnama

गैरवर्तन

छत्तीसगढ प्रदेश कार्यालयात खोली बंद करून आपल्यासोबत मीडिया सेल प्रमुखांकडून गैरवर्तन केले गेले, असा गंभीर आरोप.

Radhika Khera | Sarkarnama

बघेलांवर आरोप

गैरवर्तनाबाबत माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना सांगितल्यानंतर ते छत्तीसगढ सोडून जा म्हणाल्याचा खेडा यांचा आरोप.

Radhika Khera with Bhupesh Baghel | Sarkarnama

भारत जोडो न्याय यात्रा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस नेते सुशील आनंद शुक्ला यांनी मद्य पिण्याची ऑफर दिल्याचा आरोप.

Radhika Khera with Rahul Gandhi | Sarkarnama

भेट नाही

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना मागील तीन वर्षांपासून भेटीची वेळ मागत आहे, अजून उत्तर नाही, असा खेडा यांचा दावा.

Radhika Khera with Priyanka Gandhi | Sarkarnama

महिलांवर अन्याय

काँग्रेसमध्ये महिलांवर अन्याय होत असून विरोध बोलल्यानंतर पक्षातून काढून टाकले जात असल्याचे राधिका खेडा म्हणाल्या आहेत.

Radhika Khera | Sarkarnama

लढणार

आरोपींना शिक्षा होईपर्यंत न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे राधिका यांनी स्पष्ट केले आहे. इतर पक्षात जाणार नसल्याचेही सांगितले.

Radhika Khera | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्रातील 'या' आहेत तिसऱ्या टप्प्यातील 'हाय व्होल्टेज' लढती!