Laxman Singh Expelled - काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले लक्ष्मण सिंह आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

मध्य प्रदेशमधील माजी आमदार -

काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी आमदार लक्ष्मण सिंह यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

Laxman Singh | Sarkarnama

दिग्विजय सिंह यांचे बंधू -

लक्ष्मण सिंह हे काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचे धाकटे भाऊ आहेत.

पक्षविरोधी कारवाया -

मात्र पक्षविरोधी कारवायांमुळे लक्ष्मण सिंह यांना काँग्रेसने ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.

Laxman Singh | Sarkarnama

कारणे दाखवा नोटीस -

काँग्रेसने लक्ष्मण सिंह यांना त्यांच्या विधानाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती

Laxman Singh | Sarkarnama

दहा दिवसांत मागितले उत्तर -

एवढंच नाहीतर पक्षाने लक्ष्मण सिंह यांना १० दिवसांत उत्तर देण्यास देखील सांगितले होते.

Laxman Singh | Sarkarnama

गांधी कुटुंबावर टिप्पणी -

लक्ष्मण सिंह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याविरुद्ध टिप्पणी केली होती

Laxman Singh | Sarkarnama

ओमर अब्दुल्लांवर आरोप -

लक्ष्मण सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर दहशतवाद्यांना भेटल्याचा आरोप केला होता.

Laxman Singh | Sarkarnama

नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा काढा -

शिवाय काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा काढून घ्यावा, असंही लक्ष्मण सिंह यांनी म्हटलं होतं.

Laxman Singh | Sarkarnama

राहुल गांधींवरही भाष्य -

तसेच, त्याचवेळी लक्ष्मण सिंह यांनी राहुल गांधींवरही भाष्य केले होते.

Laxman Singh | Sarkarnama

राहुल गांधींनी विचारपूर्वक बोलावे -

राहुल गांधींनी विचारपूर्वक बोलावे, ते विरोधी पक्षनेते आहेत, असं ते म्हणाले होते.

Laxman Singh | Sarkarnama

Next : सुंदरतेसह बुद्धिमत्तेचं उत्तम उदाहरण; IAS वंदना मीणा यांच्या 10 खास फोटोंवर एक नजर

IAS Vandana Meena | Sarkarnama
येथे पाहा