Rashmi Mane
राजकीय वर्तुळापासून सोशल मीडियापर्यंत काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसं राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी कंगना रनौत यांच्या फोटोखाली आक्षेपार्ह कॅप्शन लिहिलं होतं.
सुप्रिया श्रीनेत या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तसेच काँग्रेस सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफाॅर्मच्या अध्यक्ष आहेत.
राजकारणात येण्यापूर्वी सुप्रिया यांनी 'ईटी नाऊ' वाहिनीमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम केले आहे.
त्यांनी तब्बल 17 वर्षे विविध प्रसारमाध्यमांमध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे.
2019 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
उत्तर प्रदेशचे माजी खासदार हर्षवर्धन यांच्या त्या कन्या आहेत.
R