Indira Gandhi Death Anniversary : इंदिरा गांधींच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी वाहिली आदरांजली

Rashmi Mane

इंदिरा गांधी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली.

Sarkarnama

39 वी पुण्यतिथी

31 ऑक्टोबर, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 39 वी पुण्यतिथी आहे.

Sarkarnama

सोनिया गांधी

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज शक्तिस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

Sarkarnama

मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Sarkarnama

राहुल गांधी

राहुल गांधींचीही प्रमुख उपस्थिती होती.

Sarkarnama

'आयर्न लेडी'

'आयर्न लेडी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917ला प्रयागराज येथे झाला.

Sarkarnama

'मंकी ब्रिगेड'

लहानपणी इंदिरा गांधींनी 'मंकी ब्रिगेड' या नावाने ओळखल्या जाणार्‍या मुलांचा एक गट तयार केला, जो भारतीय झेंडे वाटायचा आणि पोलिसांची हेरगिरी करत असे.

Sarkarnama

काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवड

इंदिरा गांधी 1959 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि 1964 मध्ये राज्यसभेच्या सदस्य झाल्या.

पहिल्या महिला पंतप्रधान

1966 मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली.

Next : कोल्हापूरच्या 'सहा' आमदारांनी दिला मराठा आरक्षण पाठिंबा

येथे क्लिक करा