Sachin Fulpagare
2014 ते 2022 दरम्यान एडीआर डेटानुसार गेल्या 6 वर्षांत काँग्रेसची कमाई 29 टक्क्यांनी कमी झाली. तर भाजपची कमाई दुपटीने वाढली.
काँग्रेसने पक्षाच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त 'डोनेट फॉर देश' ही अभियान सुरू केले आहे. पक्षाच्या आर्थिक बळकटीसाठी हे अभियान सुरू केल्याचे नेत्यांनी म्हटले.
काँग्रेसला कॉर्पोरेट फंडिंग मिळत नाहीये का? निधी नसल्याने काँग्रेसला क्राउड फंडिंगची गरज पडली का? काँग्रेस पक्षाच्या फंडवरून आता असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भाजपची कमाई वाढली आहे आणि काँग्रेसच्या कमाईत 29 टक्क्यांनी घट झाली आहे. 2014 पासून ते 2022 पर्यंत काँग्रेसची कमाई कमी होऊन ती 541 कोटीच राहिली.
2014-15 भाजपने पॉलिटिकल फंडिंगद्वारे 970 कोटींची कमाई केली होती. 2017-18 मध्ये वाढून 1027 कोटी झाली. 2019-20 मध्ये तीन पट वाढून 3623 कोटी झाली.
2021-22 मध्ये भाजपची कमी होऊन 1917 कोटी झाली होती. मात्र, 6 वर्षांतील सरासरी काढल्यास भाजपच्या फंडिंगमध्ये 2 पटीने वाढली आहे.
2021-22 च्या उपलब्ध डेटानुसार भाजपच्या प्रॉपर्टीचा आढावा घेतल्यास ती 6 हजार कोटींहून अधिक होते. तर, काँग्रेसकडे फक्त 805 कोटींची प्रॉपर्टी आहे.