Praful Patel : प्रफुल पटेलांविरोधातील भ्रष्टाचाराचा खटला सात वर्षांनंतर बंद

Vijaykumar Dudhale

विमान भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रकरण

एअर इंडियासाठी विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप तत्कालीन नागरी उडयन मंत्री प्रफुल पटेल यांच्या विरोधात करण्यात आला होता.

Praful Patel | Sarkarnama

गुन्हा दाखल 2017 मध्ये

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने मे 2017 मध्ये नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.

Praful Patel | Sarkarnama

सात वर्षे तपास

विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रकरणात अनियमिततेच्या आरोपाची सीबीआयाने सुमारे सात वर्षे तपास केला. त्यानंतर सीबीआयने प्रफुल्ल पटेल, एमओसीए आणि एअर इंडियाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना क्लीन चिट देऊन त्या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला आहे.

Praful Patel | Sarkarnama

क्लोजर रिपोर्ट

या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट 19 मार्च 2024 रोजी सक्षम न्यायालयासमोर दाखल करण्यात आला आहे.

Praful Patel | Sarkarnama

मंत्रिपदाचा गैरवापर

एमओसीए, एअर इंडिया आणि खासगी अधिकाऱ्यांसह तत्कालीन सार्वजनिक वाहक एअर इंडियासाठी त्या वेळचे नागरी उड्डयन मंत्री प्रफुल पटेल यांनी मोठ्या प्रमाणात विमाने भाडेतत्त्वावर घेण्याचा कट रचून आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर हेाता.

Praful Patel | Sarkarnama

विमाने भाडेतत्त्वावर

एअर इंडियासाठी त्यावेळी विमान खरेदीचा कार्यक्रम सुरू असताना ही विमाने भाडेतत्त्वावर घेण्यात आला, असा आरोप करण्यात आला होता.

Praful Patel | Sarkarnama

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष

खासदार प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.

Ajit Pawar-Praful Patel | Sarkarnama

शरद पवारांची साथ सोडली

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करत शरद पवार यांची साथ सोडली आहे.

R

Praful Patel | Sarkarnama

NEXT : शिवसेनेचे आठ शिलेदार निवडणूक रिंगणात

येथे क्लिक करा..