Rashmi Mane
राजस्थानच्या चुरू येथे 1997 मध्ये जन्मलेल्या ऐश्वर्या शेओरान लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूलमधून झाले.
12वी बोर्डात ऐश्वर्याने गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांत शाळेत टॉप केले. बोर्डाच्या परीक्षेत त्याने ९७.५ टक्के गुण मिळवले होते.
ऐश्वर्याने दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्या इकॉनॉमिक ऑनर्समध्ये पदवीधर आहेत.
प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे ऐश्वर्याचे स्वप्न होते. परंतू तिच्या आईला तिला ब्युटी क्वीन बनलेलं बघायचे होते.
आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्याने मॉडेलिंगकडे पाऊल टाकले. 2015 मध्ये एका स्पर्धेदरम्यान त्यांनी मिस दिल्लीचा किताब जिंकला होता.
2016 मध्ये ऐश्वर्याने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये त्या फेमिना मिस इंडियाच्या फायनल राऊंड पर्यंत गेल्या होत्या.
ऐश्वर्या शेओरानने 2018 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांनी कोणत्याही कोचिंग शिवाय यूपीएएसीचा अभ्यास केला . यश प्राप्त केले.
2020 मध्ये UPSC ऑल इंडियामध्ये त्याने 93 वा क्रमांक मिळवला. मॉडेल असलेल्या ऐश्वर्या आता आयएएस अधिकारी झाल्या. सध्या त्या परराष्ट्र सेवेत आहेत आणि त्या पॅरिसमध्ये (IFS) भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत आहेत.