Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खासदारही होता; तुम्हाला माहितीये का?

Ganesh Thombare

करोडो भारतीयांचं आशास्थान

क्रिकेटच्या मैदानावर आजही सचिन तेंडुलकरचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. सचिन हा केवळ एक खेळाडू नव्हे तर आजही करोडो भारतीयांचं आशास्थान आहे.

Sachin tendulkar birthday | Sarkarnama

50 वा वाढदिवस

विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. सचिनच्या निवृत्तीला बरीच वर्ष झाली असली तरी क्रिकेटच्या मैदानावर आजही त्याच्या नावाची चर्चा असते.

Sachin tendulkar birthday | Sarkarnama

17 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण

वयाच्या 17 व्या वर्षी सचिनने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2013 मध्ये त्याने त्याचा शेवटचा अंतरराष्ट्रीय सामना खेळला तेव्हा तो 40 वर्षांचा होता.

Sachin tendulkar birthday | Sarkarnama

राष्ट्रपती नियुक्त खासदार

सचिनला राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती. सचिन 2012 ते 2018 या दरम्यान राष्ट्रपती नियुक्त खासदार होता.

Sachin tendulkar birthday | Sarkarnama

सचिनला संसदेत झाला होता विरोध

सचिनने संसदेत क्वचितच वेळ घालवला. सचिनच्या सभागृहातील अनुपस्थितीबाबत खासदार नरेश अग्रवाल यांनी आक्षेप नोंदवला होता.

Sachin tendulkar birthday | Sarkarnama

खासदारीकीचे वेतन मदत निधीला

खासदार म्हणून मिळालेलं सगळं वेतन आणि भत्ते सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मदत निधीला दिले.

Sachin tendulkar birthday | Sarkarnama

काम कौतुकास्पद

सचिन तेंडुलकरने राज्यसभा खासदार म्हणून केलेलं काम नक्कीच कौतुकास्पद राहिलं आहे.

Sachin tendulkar birthday | Sarkarnama

Next : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ते 'वंचित'चे शिल्पकार...!

Sarkarnama