Chetan Zadpe
मोहम्मद अझरुद्दीन हे उत्तम क्रिकेट खेळाडू होतेच, ते भारतीय संघाचे कर्णधारही होते. नुकत्याचे झालेल्या तेलंगणा विधानसभेत त्यांचा पराभव झाला. जुबली हिल्स या मतदारसंघातून ते काँग्रेसचे उमेदवार होते.
भारतीय क्रिकेट संघातून निवृत्त झाल्यानंतर किर्ती आझाद यांनी भाजप तर कधी काँग्रेस असा प्रवास राहिला. सध्या ते काँग्रेसचे नेते म्हणून कार्यरत आहेत.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मोहम्मद कैफने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या फुलपूर लोकसभा लढवली. पण राजकारणाच्या खेळपट्टीवर ते क्लीन बोल्ड झाले.
क्रिकेटनंतर नवज्योत सिंह सिद्धू यांनी राजकीय खेळपट्टीवर मोठी इनिंग खेळली. 2004 मध्ये भाजप प्रवेश, दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. भाजप सोडल्यानंतर काँग्रेसचे नेते आहेत.
मनोज तिवारी 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टीएमसीने त्यांना हाबरा येथील सिबपूरमधून विधानसभा निवडणुकीत उभे केले आणि तिवारी यांनी तेथे मोठा विजय नोंदवला. ते आता बंगाल सरकारचे क्रिडामंत्री आहेत.
सचिन तेंडुलकर यांचा राजकारणात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी, काँग्रेसने त्यांना राज्यसभा सदस्यत्व बहाल केले होते. काँग्रेसच्या कार्यकाळातच त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गौतम गंभीर भाजपमध्ये दाखल झाले. दिल्लीत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. आता ते भाजपचे विद्यमान खासदार आहेत.