Deepak Kulkarni
संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी अलिबागमध्ये झाला.
वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉमची पदवी घेतली आहे.
पत्रकारितेपासून कारकिर्दीची सुरुवात झाली. क्राईम रिपोर्टर म्हणूनही राऊत यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले.
याचकाळात संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेत भरले. दैनिक सामना सुरु झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना बोलावून घेतले.
ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार असून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तीनही पिढ्यांसोबत जुळवून घ्यायचे कौशल्य संजय राऊत यांनी आत्मसात केले आहे.
2019 च्या सत्तानाट्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणणाऱ्या दोन नेत्यांपैकी एक होय.
तेव्हापासून संजय राऊत यांनी शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची जागा काबीज केली आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरही राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीकेची तोफ डागणं सुरुच ठेवलं आहे.
पत्राचाळ प्रकरणात त्यांना ईडीने अटक केल्यानंतर १०४ दिवसांचा तुरुंगवास भोगला होता.