Ganesh Thombare
पोलीस प्रशासनात 'पीएसआय' पल्लवी जाधव यांची ओळख एक दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून आहे.
पीएसआय पल्लवी जाधव या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे.
पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या आहेत.
खाकीतील सौंदर्यवती अशी ओळख असलेल्या 'पीएसआय' पल्लवी जाधव या 15 मे 2022 रोजी विवाहबंधनात अडकल्या.
कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना त्यांनी 'एमपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण केली.
कमवा आणि शिका या योजनेतून 2015 साली 80 टक्के गुण मिळवून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली.
पल्लवी जाधव यांना लहानपणापासून अभिनयाची आवड आहे. त्यामुळे नोकरी करत असताना त्या आपला छंद जपण्याचा प्रयत्न करतात.
2020 मध्ये जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी रनर अपचा किताब जिंकला होता.