सरकारनामा ब्यूरो
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षीप्रमाणे सावरगाव घाट येथे दसरा मेळावा झाला.
वर्ष २०१६ मध्ये या मेळाव्याला सुरुवात झाली असून, हे मेळाव्याचे आठवे वर्ष होते.
भगवान गडावरील भगवानबाबांचे दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याला सुरुवात केली.
पंकजा मुंडेंचे सावरगाव येथील लोकांनी पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत केले.
सावरगाव येथील जनतेसमोर कृतज्ञता व्यक्त करत तेथील जनतेचे आभार मानले.
या वेळी भाषणात 'शेतकरी आणि ऊसतोड कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही त्या म्हणाल्या.'
भर उन्हात उभे राहून आणि तांत्रिक अडचणी येत असतानाही पंकजा मुंडेंनी आपले भाषण सुरू ठेवले होते.
या मेळाव्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
मेळाव्यासाठी सावरगाव येथे पंकजा मुंडे समर्थकांनी अलोट गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.