Devendra Fadnavis Birthday : युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ; जाणून घ्या देवेंद्र फडणवीसांची कारकिर्द…

Rashmi Mane

देवेंद्र फडणवीस

ओळखलतं का ? हे आहेत भारतीय जनता पक्षाचे आजघडीचे ताकदवान, वजनदार नेते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 ला झाला.

Devendra Fadnavis Birthday | Sarkarnama

कारकिर्दीवर नजर टाकुया

महाराष्ट्राच्या राजकारणात एक दमदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते भाजपचे युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात...

Devendra Fadnavis Birthday | Sarkarnama

तरुण मुख्यमंत्री

उमेदीच्या वयात असतानाच महापौर झालेल्या फडणवीसांनी राजकारण आणि पक्षात वेगवेगळ्या पातळ्यांवर भूमिकांना न्याय देत, सर्वात तरूण उपमुख्यमंत्री होण्याचा मान पटकावला आहे.

Devendra Fadnavis Birthday | Sarkarnama

लाडके नेते

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली. अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील लाडके नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले.

Devendra Fadnavis Birthday | Sarkarnama

युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष

1989 मध्ये देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये सक्रीय झाले होते. त्यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 1990 साली त्यांच्यावर नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली.

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

'तरूण महापौर'

1992 ला देवेंद्र फडणवीस हे भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष झाले. 1992 ते 2001 या काळात ते नागपूरचे महापौर होते. सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य म्हणूनही ते निवडून आले आहेत . तसेच सर्वात 'तरूण महापौर' होण्याचा बहुमानही फडणवीस यांच्याच नावावर आहे

Devendra Fadnavis Birthday | Sarkarnama

पहिल्यांदा आमदार

1994 ला फडणवीस भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले आणि 1999 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2001 साली देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली.

Devendra Fadnavis Birthday | Sarkarnama

प्रदेश सरचिटणीस

फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने उभारी आली ती म्हणजे 2010 ला भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर.

Devendra Fadnavis Birthday | Sarkarnama

दुसरे तरुण मुख्यमंत्री

2014 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या यशाची कमान वाढतच गेली. 2022 च्या राजकीय बंडानंतर फडणवीसांकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. अशा या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला सरकारनामा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Devendra Fadnavis favorite food | Sarkarnama

Next : जागृती अवस्थींनी आईंला बसवले 'आयएएस'च्या खुर्चीत ; फोटो प्रचंड व्हायरल!

येथे क्लिक करा