Amit Ujagare
भारतातील १२० कोटींहून अधिक मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने 'संचार साथी' हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे.
मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आता मोबाईल युजर्सना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रण, फसवणुकीपासून संरक्षण, सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
शासनाच्या या उपक्रमामुळं देशातील नागरिकांसोबत घडत असलेल्या डिजिटल धोक्यांपासून सुरक्षेसाठी 'संचार साथी' हा उपक्रम मदतशीर ठरत आहे.
या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी http://sancharsaathi.gov.in या वेबसाईटला भेट देण्याची तसंच नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचं आवाहन दूरसंचार विभागाचे संचालक विनय जांभळी आणि उपमहासंचालक सुमनेश जोशी यांनी केलं आहे.
'संचार साथी' पोर्टलवर 'Know Your Mobile Connections', 'Block Your Lost/Stolen Mobile' आणि 'Verify IMEI' या महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध आहेत.
या सेवांद्वारे नागरिकांना आपल्या नावावर किती कनेक्शन आहेत, हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाइल डिव्हाइस IMEI ब्लॉक करणे, तसेच IMEI क्रमांकाची सत्यता पडळता येते.
'या' विशेष सेवेच्या माध्यमातून संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप चॅट यांची नोंद नागरिक करू शकतात.
त्यामुळं फसवणूक, सायबर गुन्हे, बनावट ओळख निर्माण करणे तसेच कमर्शिअल मेसेजवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे.