Rashmi Mane
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला.
मनोभावे आरती करत अजित पवारांनी केली श्रीगणेशाची आराधना केली.
अजित पवार गणपती बाप्पासमोर नतमस्तक झाले.
पुणे दौऱ्यादरम्यान पुण्याचे ग्रामदेवता म्हणून ओळख असणाऱ्या पहिल्या मानाच्या कसबा गणपतीची पूजा केली.
याबरोबरच तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील राजाराम मित्र मंडळ, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, साने गुरुजी तरुण मंडळ आदी मंडळांना भेटी देऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले.
या वेळी राज्यात ज्या भागात अद्याप पाऊस पडलेला नाही, त्या भागात जोरदार पाऊस पडू दे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे; तसेच सर्वांच्या जीवनात सुख-समाधान, शांती, यश, आर्थिक सुबत्ता, समृद्धी नांदू दे, असं साकडं श्रीगणराया चरणी घातलं.