Deepak Kulkarni
नेहमी राजकारणात व्यस्त असलेल्या फडणवीसांना टपरीवर चहा घेण्याचा मोह आवरता आला नाही.
देवेंद्र फडणवीस सध्या राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. त्यांना महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा मानला जाते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आले होते.
किशोर धर्मे या मित्राकडे जात असताना त्यांना चहाची टपरी दिसली. खामला मार्केट ते जयप्रकाशनगर मार्गावरील टपरीवर ते थांबले.येथे त्यांनी चहा मागितला.
एरवी राजकारणात व्यस्त असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पावसाळी वातावरणाची संधी साधत जुन्या मित्रांसोबत मस्त वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेतला.
हे फोटो शेअर करताना फडणवीस यांनी टपरीवरचा चहा नागपूरकरांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. चाय पे चर्चा! असं म्हटलं आहे.
याचवेळी फडणवीसांसोबत फोटो काढण्यासाठी तरूणाई पुढे सरसावली.
उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण ताफ्यासह घेतलेला चहा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.