Rashmi Mane
सुमित्रा महाजन हे भारतीय राजकारणातील एक मोठे नाव आहे. महाजन यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक उच्च पदांवर काम केले आहे.
त्या लोकसभेच्या 16 व्या अध्यक्ष राहिल्या आहेत. हे पद भूषवणाऱ्या त्या भारतातील दुसऱ्या महिला आहेत.
या वर्षी '12 एप्रिल'ला सुमित्रा महाजन त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहे.
1982 मध्ये पहिल्यांदा त्या इंदूर महानगरपालिकेच्या उपमहापौर झाल्या. यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही.
सुमित्रा महाजन इंदूर लोकसभा मतदारसंघातून सलग 'आठ' वेळा विजयी झाल्या आहेत. 1989 मध्ये त्यांनी इंदूरमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती.
1999 ते 2004 या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्या राज्यमंत्री होत्या.
त्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत.
त्या येथून सलग आठव्यांदा खासदार झाल्या आहेत, ही कोणत्याही खासदारासाठी गौरवास्पद बाब आहे.