Jagdish Patil
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांना काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
तेलंगणा राज्यसभेची उमेदवारी जाहीर करताच आता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या निवडणुकीत बंडखोरीमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
पराभव होऊनसुद्धा काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिलेले सिंघवी कोण आहेत, जाणून घेऊया.
अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसचे प्रवक्ते असून ते अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत.
सिंघवी यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1959 रोजी जोधपूर, राजस्थान येथे झाला.
बी.ए.(प्रेस्टीज), एम.ए., पीएच.डी. नंतर दिल्लीच्या सेंट कोलंबिया स्कूलमधून PIL चे शिक्षण घेतलं तर अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवली.
त्यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेते असून पक्षासह सरकारमध्येही त्यांनी महत्वाची पदे भूषवली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे.