Rashmi Mane
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या १० जून रोजी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.
10 जून 1999 ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली.
पक्षातील मतभेदामुळे शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
इंदिरा गांधी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर देवराज उर्स यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. या पक्षामध्ये शरद पवारही सामील झाले होते. या पक्षाचे पक्ष चिन्ह 'चरखा' होते.
राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा शरद पवार काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे समाजवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला.
समाजवादी पक्षामध्ये सरत चंद्र सिन्हा यांचा स्वतंत्र गट पडला आणि 'चरखा' चिन्हावर त्यांनी हक्क सांगितला. त्यामुळे निवडणुक आयोगाने 'चरखा' हे चिन्ह गोठवले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सरत चंद्र सिन्हा यांनी आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन करत असल्याची घोषणा केली. त्यासोबत पक्षाचे ‘चरखा’ चिन्ह राष्ट्रवादीला देत असल्याची घोषणा केली होती.
पक्ष स्थापनेनंतर शरद पवार यांनी निवडणूक आयेगाकडे 'चरखा' या चिन्हासाठी अर्ज केला. मात्र, समाजवादी पक्ष अस्तित्वात नसल्याने निवडणुक आयोगाने पक्ष चिन्ह गोठवण्यात आले असल्याचे सांगितले.
निवडणुक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ या चिन्हावर समाधान मानावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत चिन्ह घड्याळ हेच राहिले.