Sunil Balasaheb Dhumal
धमकीच्या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ आणि २५ एप्रिल रोजी केरळ दौऱ्यावर आहेत.
कोची येथे सोमवारी त्यांचा दोन किलोमीटर अंतराचा 'रोड शो' पार पडला.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केरळचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
केरळच्या वेशभूषेत पंतप्रधान मोदी आपला ताफा सोडून १५ मिनीटांहून अधिक काळ रस्त्यावरून चालले.
पंतप्रधान मोदींनी नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. त्यांचे ठिकठिकाणी ओवाळून स्वागत करण्यात आले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र केरळच्या प्रदेशाध्यक्षांकडे आले होते.
गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्बरचा वापर करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
धमकीच्या पार्श्वभूमीवर या 'रोड शो'मध्ये पोलिसांसह 'सीआरएफ'चा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.