Mangesh Mahale
बच्छाव मूळच्या मालेगावच्या असून त्यांचे आजोळ धुळे तर सासर सोनज (मालेगाव) येथीलआहे.
गेल्या ३५ वर्षांपासून त्या नाशिक शहरात कार्यरत आहेत.
नगरसेवक, महापौर, आमदार आणि राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
धुळ्याच्या पालकमंत्री होत्या. धुळे जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून त्या परिचित आहेत.
काँग्रेसच्या परंपरागत अल्पसंख्यांक मतांची विभागणी टाळणे हे त्यांच्यापुढे आव्हान असेल.
त्यांच्या उमेदवारीला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. धुळे, नाशिक जिल्ह्याध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी राजीनामा दिला.
शेवाळे यांच्या कार्यालयात भेटीसाठी आलेल्या बच्छाव यांच्यासमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली.
आयात उमेदवार चालणार नाही, शोभा बच्छाव परत जा, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
डॉ.शोभा बच्छाव यांच्याकडून कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
NEXT: आम आदमी पार्टीला आणखी झटका, मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा!