King Charles III Coronation: ब्रिटेनचा राजा चार्ल्स तिसरा यांच्या राज्याभिषेकाचे 'हे' खास फोटो पाहिले का?

अनुराधा धावडे

राजा चार्ल्स तिसरा राज्याभिषेक सोहळा

'ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरा यांचा आज (६ मे) राज्याभिषेक सोहळा पार पडला.

King Charles III Coronation | Twitter

पत्नी राणी कॅमिला राज्याभिषेक

त्यांची पत्नी राणी कॅमिला यांचाही त्यांच्याबरोबर राज्याभिषेक करण्यात आला

King Charles III Coronation | Twitter

वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये राज्याभिषेक

ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

King Charles III Coronation | Twitter

70 वर्षांनंतर राज्याभिषेकाचा योग

ब्रिटनच्या राजघराण्यात 70 वर्षांनंतर राज्याभिषेक सोहळा पार पडला. यापूर्वी 1953 मध्ये राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला होता.

King Charles III Coronation | Twitter

वयाच्या 74 व्या वर्षी राज्याभिषेक

किंग चार्ल्स यांचा वयाच्या 74 व्या वर्षी राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झालेल्या वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमधील हे दृश्य आहे.

King Charles III Coronation | Twitter

राज्याभिषेकासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी

राजाचा ताफा ज्या मार्गावरून गेला त्या मार्गावर हजारो लोक उपस्थित होते. यावेळी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा ब्रिटीश झेंडे फडकवण्यात आले.

King Charles III Coronation | Twitter

अनेक महिन्यांपासून राज्याभिषेकाची तयारी

या सोहळ्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती. राजा चार्ल्स सोन्याचे पांढरे घोडे असलेल्या रथावर बसले होते.

King Charles III Coronation | Twitter

आर्चबिशप यांनी दिली शपथ

वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये आर्चबिशप यांनी राजा चार्ल्स यांना शपथ दिली.

King Charles III Coronation | Twitter

प्रिन्स हॅरी सोहळ्याला उपस्थित होते

ड्यूक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी पत्नी मेघनशिवाय वडिलांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. मात्र, या समारंभात त्यांची कोणतीही औपचारिक भूमिका नव्हती

King Charles III Coronation | Twitter

IPS Preeti Chandra : पत्रकार ते IPS अधिकारी; ज्यांचं नाव ऐकल्यावर गुन्हेगार ही थरथर कापतात

Preeti Chandra | Sarkarnama