डिजिटल जनगणना महाराष्ट्रात 1 मे पासून सुरु: नागरिकांनाही करता येणार स्व-गणना

Amit Ujagare

१) १ मे पासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरु

१ मे पासून महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा सुरु होत आहे. भारताची ही १६ वी जनगणनेला सुरुवात होत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात स्व-गणना १ ते १५ मे पर्यंत चालणार आहे.

Census of India

२) कागदी फॉर्म्सपासून मुक्ती

ही जनगणना डिजिटल असून यामध्ये नागरिक आपल्या फोनद्वारे यामध्ये आपली माहिती भरु शकतात. तसंच १ ते १५ मे दरम्यान आपण स्वगणना देखील करु शकतो.

Census of India

३) पोर्टलवर जाऊन नोंदणी

यासाठी se.census.gov.in या पोर्टलवर जाऊन आपला फोन क्रमांक टाकून ओटीपी आल्यानंतर हा फॉर्म नागरिकांना अॅक्सेस करता येणार आहे.

Census of India

४) जिओ लोकेशन

सुरुवातीला यामध्ये जिओ लोकेशन द्यावं लागेल, त्यानंतर यामध्ये आपल्या कुटुंबाबत ३३ प्रश्न विचारले जातील.

Census of India

५) SE क्रमांक जनरेट होईल

या प्रश्नांची उत्तर भरल्यानंतर एक SE क्रमांक जनरेट होईल. हा ११ डिजिटचा क्रमांक असेल, यानंतर १५ मेनंतर आपल्या घरी जे जनगणना कर्मचारी येतील, त्यांना हा क्रमांक द्यावा लागेल.

Census of India

६) माहितीची पडताळणी होणार

त्यानंतर हे जनगणना कर्मचारी स्वतः तुमची माहितीची पडताळणी करुन जनगणनेच्या डेटाबेसमध्ये ही सर्व माहिती भरणार आहेत.

Census of India

७) जास्तीत जास्त सहभाग

त्यामुळं या डिजिटल जनगणनेत जास्तीत जास्त नागरिकांना सहभाग घ्यावा असं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.

Census of India

८) जिल्हाधिकाऱ्यांची माहती

यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रातिनिधीक स्वरुपात याची माहिती दिली आहे.

Census of India