KP Sharma Oli : विद्यार्थी असल्यापासून राजकारणात अन् आता विद्यार्थ्यांनीच काढला पंतप्रधानांचा काटा...

Rashmi Mane

नेपाळमध्ये मोठं आंदोलन

नेपाळमध्ये सध्या मोठी राजकीय आणि सामाजिक उलथापालथ सुरू आहे. 8 सप्टेंबर 2025 ला काठमांडूसह अनेक शहरांमध्ये तरुणांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन केलं. या आंदोलनाचं मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर घातलेली अचानक बंदी.

आंदोलनाचा चेहरा: Gen Z

डिजिटल स्वातंत्र्य हिरावून घेतल्यामुळे जनरेशन Z म्हणजेच नवी पिढी संतापली आणि रस्त्यावर उतरली. आंदोलन हिंसक वळण घेतलं. अखेर सरकारला सोशल मीडिया बंदी मागे घ्यावी लागली. तरीही आंदोलक आता पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

गरीब कुटुंबात

केपी शर्मा ओली हे नेपाळचे एक ज्येष्ठ आणि वादग्रस्त नेते आहेत. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1952 रोजी पूर्व नेपाळातील गरीब कुटुंबात झाला.

तुरुंगवास

14 व्या वर्षीच त्यांनी राजशाही आणि पंचायत व्यवस्थेविरोधी आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर 1979 ला झापा चळवळीत सहभागी झाल्यामुळे 1973 ते 1987 या काळात ते तब्बल 14 वर्षे तुरुंगात होते. त्यापैकी 4 वर्षे त्यांनी एकांत कारावास भोगला आहे.

राजकारणात सक्रिय

जेलमधून सुटल्यानंतर ओली राजकारणात सक्रिय झाले. 1991 मध्ये पहिल्यांदा खासदार बनले, तर 1994 मध्ये ते गृहमंत्री झाले. नंतर उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्रीही राहिले.

पंतप्रधानपदी विराजमान

ओली हे 2015 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. 2015-16, 2018-21 आणि काही महिन्यांसाठी 2021 मध्ये त्यांनी पंतप्रधानपद सांभाळलं. 15 जुलै 2024 रोजी चौथ्यांदा पंतप्रधान झाले.

आक्रमक शैली

ओली यांना त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखलं जातं. मात्र, त्यांच्यावर अनेक वेळा बरेच आरोप- प्रत्यारोप झालेत.