सरकारनामा ब्युरो
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दिल्ली येथे भाजप स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अँटनी यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंटरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसशी मतभेद झाले होते.
काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे प्रमुख होते.
"मुलगा भाजपमध्ये गेल्याचे खूप दुःख आहे. त्याने चुकीचा निर्णय घेतला", असे ए. के. अँटनी म्हणाले.
"आमचे विचार वेगळे आहेत, मात्र आमच्यातील वडील-मुलाचे नाते पहिल्यासारखेच असेल", असे अनिल अँटनी म्हणाले.
भाजप देशासाठी काम करत आहे, तर काँग्रेस दोन-तीन व्यक्तींसाठी काम करणारा पक्ष असल्याची टीका अनिल अँटनी यांनी प्रवेशानंतर केली.