सरकारनामा ब्यूरो
आयएएस झाल्यानंतर एसडीएम,डीएम,एडीएम या पदावर IAS अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. मात्र, हे पद सर्वोच्च नसतात तर कोणती आहेत सर्वोच्च पद असतात जाणून घेऊयात.
IAS झालेल्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या स्तरावर पदोन्नती मिळते. त्यांचा कामाचा असलेला अनुभव पाहून त्यांची नेमणूक केली जाते.
IAS अधिकाऱ्यांना IAS प्रोबेशनरी अधिकारी यांना मसुरी येथे प्रशिक्षण दिले जाते.
उपविभागीय दंडाधिकारी (SDM) किंवा उपविभागीय अधिकारी (SDO) हे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, विकास कामांवर लक्ष ठेवतात.
अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (ADM) जिल्हा प्रशासनात जिल्हा दंडाधिकारी (DM) यांना मदत करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ग्रामीण विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असतात.
जिल्हा दंडाधिकारी (DM) किंवा जिल्हाधिकारी हे सर्वात महत्वाचे प्रशासकीयपद आहे जे जिल्ह्याचे प्रमुख आहे. कायदा व सुव्यवस्था, विकासकामे, सरकारी योजना राबविणे हे या पदाचे मुख्य काम आहे.
30 वर्षाच्या अनुभवानंतर IAS अधिकाऱ्यांना राज्य सरकार मंत्रालयात विभागाचे प्रधान सचिव किंवा केंद्र सरकारमधील सचिवपद मिळते.
मुख्य सचिव हे IAS चे सर्वोच्च पद आहे. भारत सरकारमध्ये एक कॅबिनेट सचिव असतो, ते थेट पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करतात.