Rashmi Mane
बिहारच्या राजकारणात लालू प्रसाद यादव यांचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे.
लालू प्रसाद यादव त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे, बेधडक स्वभावामुळे आणि त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे चर्चेत असतात.
पण तुम्हाला लालू प्रसाद यादव यांचं 'लालू' हे नाव कसं पडलं माहीतीये ?
खर तर लालू प्रसाद यांचं नाव 'प्रसाद कुंदन राय यादव' असं आहे. बऱ्याच लोकांना त्यांच पूर्ण नाव माहीत नाही.
'लालू' हे नाव कसं पडलं हे फार कमी लोकांना माहीत आहे.
लालू प्रसाद यांची बहिण गंगोत्री देवी यांनी यामागची गोष्ट सांगितली होती.
गंगोत्री देवींनी सांगितलं होतं की, “लालू आम्हा सर्व भावंडांमध्ये धाकटे होते.
लहानपणापासून ते गोरे आणि तब्येतीने गुबगुबीत होते. यामुळे आमचे वडील कुंदन राय यांनी त्यांचं नाव ‘लालू’ ठेवलं”.