Rashmi Mane
UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रँकनुसार, उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते.
परंतु बहुतेकदा IAS आणि IPS पदाची चर्चा जास्त असते. ही दोन्ही पदे एकमेकांना पूरक आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का एका 'आयपीएस' अधिकाऱ्याला किती पगार असतो ?
'आयपीएस' अधिकाऱ्याचे मूळ वेतन 56,100 रुपयांपासून सुरू होते, ज्यामध्ये 8 वर्षांच्या अनुभवानंतर, पगार दरमहा 1,31,000 रुपयांपर्यंत जाते.
राज्य पोलिसांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, आयपीएस अधिकाऱ्याला केंद्र सरकार तसेच सुरक्षा दलात विविध विभागांतर्गत काम करण्याची संधी मिळते.
IPS चा पगार 7 व्या वेतन आयोगानुसार असतो आणि पगार विभाग, उपविभाग किंवा सेवांवर अवलंबून असतो.
IG म्हणजेच महानिरीक्षकाचा पगार 1 लाख 43000 रुपये आहे. 'डीजीपीं'ना दरमहा 2 लाख 25000 रुपये पगार मिळतो, 'आयपीएस' अधिकाऱ्यांना पगारासह अनेक प्रकारचे भत्ते मिळतात.
पोलीस उपअधीक्षक या पदावर आयपीएस अधिकाऱ्याला ५६ हजार १०० रुपये पगार मिळतो.
अतिरिक्त पोलीस अधीक्षकाला – 67 हजार 700 रुपये, तर पोलीस अधीक्षक – 78 हजार 800 रुपये आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक – 1 लाख 18 हजार 500 रुपये इतके, मासिक वेतन असते.
पोलिस उपमहानिरीक्षकाला - 1 लाख 31 हजार 100 रुपये, तर पोलिस महानिरीक्षक - 1 लाख 44 हजार 200, अतिरिक्त पोलिस महासंचालकांना - 2 लाख 5 हजार 400 रुपये दरमहा वेतन असते.