Rashmi Mane
पोलीस अधिकारी होण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात आणि रँकनुसार वेगवेगळ्या पोस्टींग्स मिळतात.
'डीएसपी'चा (DSP) फुलफॉर्म Deputy Superintendent of Police म्हणजेच पोलीस उपअधीक्षक असा आहे.
पोलीस उपअधीक्षक पद हे भारतातील सर्वात महत्वाचे आणि प्रमुख पदांपैकी एक आहे.
पोलीस दलात अधीक्षक म्हणून तर सहायक पोलीस अधीक्षक (एएसपी), पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) आणि पोलीस अधीक्षक (एसपी) अशी पदे असतात.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच गुन्होगारी रोखण्याचे काम पोलीस उपअधिक्षाकडे असते.
पोलीस उपअधीक्षक (DSP) अधिकाऱ्यांची नियुक्ती नागरी सेवा परीक्षेच्या आधारे केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये डीएसपींना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात.
'डीएसपी'चे वेतन ५३ हजार १०० ते १ लाख ६७ हजार ८०० रुपये इतके असू शकते.
सातव्या वेतनश्रेणीच्या नियमानुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये 'डीएसपी'चे वेतन निश्चित केले जाते.