सरकारनामा ब्यूरो
१८५४ मध्ये इंग्रजांनी भारतात नागरी सेवा परिक्षेला सुरूवात केली.
रविंद्रनाथ टागोर यांचे छोटे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले 'आयएएस' अधिकारी होते.
सत्येंद्रनाथ टागोर यांनी १८६४ मध्ये नागरी सेवा परिक्षेत यश मिळवलं होत.
सत्येंद्रनाथ टागोर हे भारताचे पहिले 'आयएएस' अधिकारी आहेत.
परिक्षेच्या तयारीसाठी १८६२ मध्ये ते इंग्लंडला गेले. १८६३ मध्ये त्यांची नागरी सेवा परिक्षेसाठी निवड झाली.
१८६४ मध्ये अधिकृतरित्या भारताचे पहिले 'आयएएस' अधिकारी बनले. अहमदाबाद शहरात त्यांची बदली झाली होती.
सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म १ जून १८४२ मध्ये झाला. जेव्हा ते 'आयएएस' अधिकारी झाले तेव्हा २१ वर्षाचे होते.
सत्येंद्रनाथ टागोर हे साहित्यिक कुटुंबातून येतात, त्यामुळे साहित्य क्षेत्रातही त्यांचे बरेच यागदान आहे.