अनुराधा धावडे
राणा हमीर सिंह हे पाकिस्तानातील एकमेव राजपूत हिंदू राजा आहेत.
पाकिस्तानात राणा हमीर सिंह हे प्रतिष्ठीत व्यक्ती आणि प्रसिद्ध राजकारणी म्हणून ओळखले जातात.
पाकिस्तानच्या राजकारणातही राणा हमीर सिंह यांचा मोठा दबदबा आहे.
ते पाकिस्तानातील अमरकोट संस्थानाचे एकमेव हिंदू राजा आहेत.
राणा हमीर सिंह यांचे वडील राणा चंद्र सिंह अमरकोटच्या सत्ताधारी घराण्यातील होते.
राणा हमीर सिंह यांच्या सुरक्षेसाठी मुस्लिम बॉडीगार्ड तैनात करण्यात आले आहे.
राणा चंद्र सिंह हे सात वेळा खासदार राहिले आहेत.
राणा चंद्र सिंह यांनी पाकिस्तानचे केंद्रीय मंत्रीपदही भुषवले आहे.
राणा चंद्र सिंह हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते असेही मानले जाते
राणा हमीर सिंह हे पाकिस्तानातील एकमेव हिंदू आहेत ज्यांना राजाचा दर्जा मिळाला आहे.