सरकारनामा ब्युरो
दांडगा जनसंपर्क, धाडसी आणि मनमिळावू स्वभाव, प्रभावी वक्तृत्व या गुणांमुळे प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत अल्प कालावधीत स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे.
भाजपतच्या आमदार श्वेता महाले या पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्या आहेत. आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या आहेत.
नमिता मुंदडा या बीडमधील केज मतदारसंघातून भाजप आमदार निवडून आल्या आहेत. उच्च शिक्षित आणि प्रचंड लोकसंपर्क असलेल्या नमिता या राज्याच्या माजी मंत्री, दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्या अदिती तटकरे या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली होती.
परभणीच्या आमदार जिंतूरच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर अत्यांत अभ्यासू आणि संयमी व्यक्ती म्हणून लोकप्रिय आहेच.
भाजप आमदार मुक्ता टिळक यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. लोकमान्य टिळकांचेे पंतु शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी आहेत. महापौर ते आमदार असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे.
राजकीय क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या महिला राजकारणी पैकी एक असणाऱ्या.वर्षा गायकवाड या काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्या आहेत.
दिवंगत नेते, माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांची पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
आक्रमक आणि अभ्यासू नगरसेविका आणि आता आमदार, असा यामिनी जाधव यांचा प्रवास राहिला आहे. त्या भायखळ्यातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आता त्या शिवसेनेविरोधात बंड पुकारत त्या शिंदे गटात सामिल झाल्या आहेत.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.