Rashmi Mane
पुण्यातील काँग्रेस भवनला अतिशय ऐतिहासिक महत्त्व आहे.
पुणे शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने काँग्रेस भवन ही आदराची आणि अभिमानाची बाब आहे.
काँग्रेस पक्षाला १३० वर्षांचा इतिहास आहे. या संपूर्ण कालखंडात पुणे शहरामध्ये काँग्रेसच्या अनेक पिढ्या होऊन गेल्या.
स्वातंत्र्यलढ्यासाठी पुण्यामध्ये ज्या चळवळी झाल्या, त्याचे उगमस्थान हे काँग्रेस भवनच होते.
पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेस भवनला 83 वर्षे पूर्ण झाली आहेत.
महात्मा गांधींनी काँग्रेस भवनला भेट देतांना ‘यह मकान सच्चे सेवकों का यानी खिदमतगारोंका निवासस्थान बने’ असं गांधीजी म्हणाले होते.
काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वाराला 'नेताजी सुभाषचंद्र बोस' असे नाव आहे.
महात्मा गांधी, राजीव गांधी अणि काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले काँग्रेस भवन हे नेहमीच पक्ष संघटनेचे कामासाठी ऊर्मी देते.