अनुराधा धावडे
भाजप नेते बसवराज बोम्मई यांचा जन्म 28 जानेवारी 1960 रोजी हुबळी येथे वीरशैव-लिंगायत समाजात झाला.
बोम्मई हे कर्नाटकचे २० वे मुख्यमंत्री असले तरी प्रत्येक सामान्य माणसाप्रमाणेच त्यांचेही काही छंद आहेत. त्यांना क्रिकेट खेळायला खूप आवडते.
मुख्यमंत्री बोम्मई यांना राजकारणाव्यतिरिक्त पुस्तके वाचणे, क्रिकेट आणि गोल्फ खेळायला आवडते.
त्यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, धारवाड आणि कर्नाटक व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
बसवराज यांच्या पत्नीचे नाव चेन्नम्मा आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे
त्यांचे वडिलांचे S.R. बोम्मई हे 1988-89 दरम्यान कर्नाटकचे 11 वे मुख्यमंत्री राहिले आहेत.
बसवराज बोम्मई यांनी पहिल्यांदा जनता दलात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
ते 1997 आणि 2003 मध्ये धारवाड स्थानिक प्राधिकरण क्षेत्रातून दोनदा कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत.
ते 1997 आणि 2003 मध्ये धारवाड स्थानिक प्राधिकरण क्षेत्रातून दोनदा कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य होते.
2008 मध्ये बसवराज यांनी जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.त्याच वर्षी भाजपच्या तिकीटावर त्यांची जलसंपदा मंत्री म्हणून नियुक्ती झाली.