Rashmi Mane
कर्जत-जामखेडचे आमदार तसेच बारामती अॅग्रोचे 'सीईओ' म्हणून उत्कृष्ट प्रशासनकौशल्य असलेले रोहित पवार यांचा आज वाढदिवस.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे असलेल्या रोहित यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर पवारांची चौथी पिढी राजकारणात उतरली आहे.
रोहित पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जलसंधारण, महिला व बाल शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा आघाडीच्या विषयांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पवार घराण्यातील नव्या पिढीचा शिलेदार म्हणून रोहित पवारांकडे पाहिले जाते.
रोहित पवारांनी कृषी क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी घेतला आणि वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये पदभार स्वीकारून व्यवसायात सक्रिय झाले.
राजकीय जीवनाची सुरुवात बारामतीतून झाली. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिर्सुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले होते.
रोहित यांचं लग्न पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर सतीश मगर यांची कन्या कुंती यांच्याशी झालं आहे. त्यांना आनंदिता आणि शिवांश अशी दोन मुलं आहेत.