अनुराधा धावडे
लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी मुगलसराय (आता उत्तर प्रदेश) येथे झाला. भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी लाल बहादूर शास्त्रींनी देशातील गरीब वर्गासाठी लढा दिला.
1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, देशात प्रचंड 'अन्न टंचाई' निर्माण झाली. या काळातही त्यांनीन सैनिक आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी 'जय जवान' 'जय किसान'चा नारा दिला.
1965 आणि 1966 मध्ये भारताला दुष्काळाचा सामना करावा लागला. तेव्हा शास्त्रीजींनी श्वेतक्रांतीद्वारे सर्व देशवासीयांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी खूप मदत केली होती.
त्यांनी सर्व शेतकऱ्यांना तांदूळ आणि गहू पिकवण्याचा आग्रह केला. लाल बहादूर शास्त्रींनी स्वतः तांदूळ आणि गहू पिकवून ही चळवळ सुरू केली होती.
1965 मध्ये, त्यांनी भारतातील हरित क्रांतीला प्रोत्साहन दिले, ज्याने देशातील शेतकऱ्यांच्या समृद्धीवर आणि भारताला अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यावर लक्ष केंद्रित केले.
रेल्वेमंत्री असताना रेल्वे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. यामुळे लाल बहादूर शास्त्री इतके हताश झाले की त्यांनी या दुर्घटनेला स्वत:ला जबाबदार धरून पदाचा राजीनामा दिला.
लाल बहादूर शास्त्री हे श्वेतक्रांतीसारख्या ऐतिहासिक मोहिमा सुरू करण्यासाठी देखील ओळखले जातात, ज्यामुळे देशात दूध उत्पादन वाढले.
लाल बहादूर शास्त्री यांना "शांततेचे प्रतीक" म्हणून ओळखले जाते. त्यांनी नेहमीच आक्रमकतेपेक्षा अहिंसेचा मार्ग पसंत केला. 1966 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
09 जून 1964 रोजी लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान बनले. पण उझबेकिस्तान येथील ताश्कंद येथे त्यांचा गूढ मृत्यू झाला.भारत-पाकिस्तान युद्धानंतरच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शास्त्रीजी ताश्कंदमध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांना भेटायला गेले होते. पण भेटीनंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला.