Rashmi Mane
जगभरात अनेक देशांमध्ये सगळे राजकारणी काळ्या रंगाच्या सूटाबूटात असतात.
आपल्याकडे राजकारणातील बहुतांश लोक पांढरे कपडे घालणे पसंत करतात.
पण पांढरा रंग परिधान करण्यामागे नेमके काय कारण आहे, चला जाणून घेऊया.
स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिला. महात्मा गांधींनी देशवासियांना चरखाच्या साहाय्याने बनवलेले खादीचे कपडे घालण्याची प्रेरणा दिली.
खादीपासून बनवलेले हे कपडे बहुतेक पांढऱ्या रंगाचे असायचे. त्यामुळे त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या क्रांतिकारकांनी ते घालण्यास सुरुवात केली.
कालांतराने पांढरा रंग नेत्यांची ओळख बनला. तेव्हापासून राजकारणी फक्त पांढऱ्या रंगाच्या कपड्यातच दिसतात.
कोणत्याही रंगाचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होत असतो. पांढरा रंग शांतता, पवित्रता, सत्य आणि अहिंसेचे प्रतिक मानला जातो.
पांढरा रंग त्या व्यक्तीमत्त्वातील साधेपणा दर्शवतो. पांढऱ्या रंगातून नेतृत्वाची जाणीव निर्माण होते. पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये कोणीही लहान-मोठा, कमी-जास्त असा फरक दिसत नाही.
भारतीय नेते आणि बहुतांश समाजसेवक पांढरे कपडे घालतात.