Dress Code of Politicians : राजकारणी मंडळी नेहमी पांढऱ्या रंगाच्याचं कपड्यात का दिसतात माहितीये ?

Rashmi Mane

पांढऱ्या रंगाचे कपडे

आपण अनेकदा पाहिलं असेल की नेते मंडळी फक्त पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसतात.

Amit Shah | Sarkarnama

पांढऱ्या रंगाची क्रेझ

देशाच्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात, ज्याला नेता बनायचे आहे, तो पांढरा कुर्ता- पायजमा वापरतोच.

Rahul Gandhi | Sarkarnama

पांढरेच कपडे का ?

पण तुम्ही कधी विचार केला आहे का ? भारतीय नेते फक्त पांढऱ्या कपड्यातच का दिसतात? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…

Sharad Pawar | Sarkarnama

स्वदेशी वस्तुंचा नारा

याच उत्तर दडलयं ते म्हणजे स्वातंत्र लढ्यात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला, तेव्हा लोकांनी विदेशी कपडे गोळा करुन त्यांची होळी केली.

Ajit Pawar | Sarkarnama

खादीचे कपडे

महात्मा गांधींनी सुरुवातीला भारतातील लोकांना चरख्यापासून बनवलेले खादीचे कपडे वापरण्याची प्रेरणा दिली. स्वावलंबनाचे प्रतीक म्हणून खादीचे कपडे घालायला सांगितले.

Eknath Shinde | Sarkarnama

'ड्रेस कोड'

खादीचे कपडे बहुतेक वेळा पांढऱ्या रंगाचे असायचे. त्यामुळे हळूहळू हेच कपडे नेत्यांचा 'ड्रेस कोड' बनला.

Raj Thackeray | Sarkarnama

पांढऱ्या कपड्यात दिसू लागली

राजकारण आणि समाजसेवा करणारे लोक नेहमी पांढऱ्या कपड्यात दिसू लागले.

Uaddhav Thackeray | Sarkarnama

सत्य आणि अहिंसेचे प्रतिक पांढरा रंग

खरे पाहता पांढरा रंग हा सत्य आणि अहिंसेचे प्रतिक आहे. जेव्हा कोणताही नेता पांढऱ्या रंगाचे ड्रेस घालतो तेव्हा, त्यांच्यामध्ये नश्चितच साधेपणा दिसून येतो. यामुळेच भारतातील नेते, समाजसेवक बहुतांश वेळा पांढरे कपडे घालतात.

Pruthviraj Chavan | Sarkarnama

Next : एकनाथ शिंदेंचा नातू रुद्रांश तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना भेटला...

येथे क्लिक करा