भारतावर 50 % टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्प यांची मुंबई, पुण्यासह देशात 'या' ठिकाणी आहे भरमसाठ संपत्ती, आकडे वाचून थक्क व्हाल

Jagdish Patil

टॅरिफ

भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय म्हणून संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतलाय.

Donald Trump | Sarkarnama

डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प एकीकडे भारताबाबत टोकाचा निर्णय घेत आहेत. मात्र दुसरीकडे ते स्वत: भारतातील उद्योगातून कोट्यवधींची कमाई करत असल्याचं समोर आलं आहे.

Donald Trump | Sarkarnama

भागीदारी

त्यांनी भारतातील भागीदारी ट्रायबेका डेव्हलपर्ससह गुरुग्राम, पुणे, हैदराबाद, मुंबई, नोएडा आणि बेंगळुरूमध्ये अशा 6 प्रकल्पांची घोषणा केली आहे.

Donald Trump | Sarkarnama

ट्रम्प टॉवर

पुण्यात 23 मजली 2 ट्रम्प टॉवर कल्याणी नगरमध्ये असून त्याचं बांधकाम 2012 मध्ये सुरू झालं होतं. जे 2015 मध्ये पूर्ण झालं. हा प्रकल्प अंदाजे 300 कोटींचा आहे.

Donald Trump Real Estate India | Sarkarnama

मुंबई

मुंबईतील वरळीमध्ये, लोढा ग्रुपने ट्रम्प यांच्या भागीदारीने 76 मजली टॉवरचे काम सुरू केलं आहे. जे 2021 मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पाचा खर्च 3000 कोटी इतका आहे.

Donald Trump Real Estate India | Sarkarnama

कोलकाता

कोलकाता येथे 38 मजली निवासी टॉवरमध्ये ट्रम्प यांनी गुतवणूक केली असून या प्रकल्पाचा खर्च जवळपास 400 कोटी इतका आहे.

Donald Trump Real Estate India | Sarkarnama

दिल्ली

दिल्लीतील एनसीआर, गुरुग्राम येथे दोन 47 मजली टॉवर सुरू केलेत. जे 2026 च्या सुरुवातीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाचा खर्च 1900 कोटी आहे.

Donald Trump Real Estate India | Sarkarnama

भागीदार

ट्रम्प यांचे भारतात प्रकल्प राबवणाऱ्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), लोढा ग्रुप, M3M ग्रुप, पंचशील रिअल्टी, IRA इन्फ्रा आणि युनिमार्क सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

Donald Trump Real Estate India | Sarkarnama

NEXT : लेदर ते ज्वेलरी! डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठल्या वस्तूंवर वाढवला कर

US Tariffs 2025 | Sarkarnama
क्लिक करा