Rashmi Mane
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर देशभरातून आणि जगभरातून लोक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत.
राम मंदिराचे नुकतेच उद्घाटन झाले. त्यामुळे राम मंदिर बघण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. मात्र, सगळ्यांनाच अयोध्येला जाता येते असे नाही.
मात्र, आता सर्वांना घरी बसून रामलल्लाचे दर्शन मोफत घेता येणार आहे.
यासाठी दूरदर्शन रामलल्लाच्या भक्तांसाठी एक खास कार्यक्रम घेऊन येत आहे,
ज्यामध्ये रामलल्लाची आरती दाखवली जाणार आहे. विशेष म्हणजे रामलल्लाची आरती प्रेक्षकांना रोज पाहता येणार आहे.
दूरदर्शन वाहिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अयोध्येतील रामलल्ला मंदिरातील दैनंदिन आरतीचे थेट प्रक्षेपण दररोज सकाळी 6:30 वाजता पाहता येणार आहे.
डीडी नॅशनलवर आता सर्वांना रामलल्लाच्या आरतीला दररोज मोफत पाहता येणार आहे.
R