Ganesh Sonawane
१. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा. नशिबावर निर्भर राहू नका.
२. हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.
३. इतिहास लिहिणारा इतिहासकार अचूक, निःपक्षपाती आणि प्रामाणिक असला पाहिजे. आयुष्य मोठे नसून उत्तम असले पाहिजे.
४. इतिहासाची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे. तो कधीही विसरु नका.
५. जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य मिळवत नाही, तोपर्यंत कायद्याने तुम्हाला दिलेले कोणतेही स्वातंत्र्य तुमच्यावर अन्याय आहे.
६. शिक्षण हे पुरुषांइतकेच महिलांसाठीही आवश्यक आहे.
७. कायदा आणि सुव्यवस्था हे राजकीय पक्षासाठी औषध आहे आणि जेव्हा राजकीय पक्ष आजारी पडतो तेव्हा औषध दिले पाहिजे.
८. माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.
९. माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.
१०. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.