Rashmi Mane
शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राजस्थानचे कोटा शहर. अशा शहरात वाढलेल्या मेघा भार्गव यांना वैद्यकशास्त्रात करिअर करण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे.
मेघा भार्गव यांची आई शाळेत मुख्याध्यापिका होती त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच शैक्षणिक आणि स्पर्धात्मक परीक्षांवर लक्ष केंद्रीत करण्यामागे त्यांच्या आईची प्रेरणा होती.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मेघा यांनी एआयपीएमटी परीक्षा दिली. या परीक्षेत यश मिळवल्यानंतर भार्गव यांनी दंतचिकित्सा करण्यासाठी सरकारी दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, मुंबई येथे प्रवेश घेतला.
सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत त्यांनी रुग्णालयात काम केले आणि संध्याकाळचा वेळ परीक्षेच्या अभ्यासासाठी दिला.
कोणत्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय त्यांनी पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेसवर समाधानी नसल्यामुळे त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि भारतीय महसूल सेवेत (IRS) रुजू झाल्या.
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना अकादमीमध्ये कामासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
मेघा भार्गव यांना NISAU UK (नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अॅल्युमनी युनियन यूके) आणि ब्रिटिश कौन्सिलने इंडिया यूके अचिव्हर्स ऑनर्सने सन्मानित केले आहे.
वित्त मंत्रालय सहआयुक्त आयकर विभाग (गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण) आहेत.
मेघा भार्गव त्यांच्या बहिणीसोबत 'समर्पण' या एनजीओ मार्फत समाजपरिवर्तनासाठी करतात काम.