सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ ते ७ जुलै महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होत्या.
या दौऱ्या दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज (7 जुलै) शिर्डीमध्ये श्री साई बाबाच्या समाधी दर्शनासाठी गेल्या होत्या.
राष्ट्रपती मुर्मु शिर्डीत येत असल्याने शिर्डी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता.
शिर्डीला भेट देणाऱ्या त्या देशाच्या पाचव्या राष्ट्रपती आहेत.
५ जुलैच्या नागपूर येथील कार्यक्रमानंतर कोराडी मंदिर परिसरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या दर्शन घेतले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल (6 जुलै) प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देत सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कालपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होत्या.