Rashmi Mane
ओडिशाच्या आदिवासी गावातून सुरु झालेली ही कथा, आजच्या भारताच्या सर्वोच्च पदावर पोहोचली आहे.
20 जून 1958 रोजी बैदापोसी या आदिवासी गावात जन्म. संथाल जमातीत जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे बालपण अत्यंत साध्या व मर्यादित साधनांमध्ये गेले.
रामादेवी महिला महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण. त्या काळात एका आदिवासी मुलीसाठी हे होतं मोठं यश!
सुरुवातीला लिपिक म्हणून आणि नंतर शिक्षिका म्हणून कार्यरत. गरिबांसाठी शिक्षणाचा वसा घेतला.
1997 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश. रायरंगपूर नगरसेविका ते 2000 मध्ये ओडिशा सरकारमधील मंत्री!
पती, दोन मुले आणि आईचे निधन – दुःखांनी भरलेले जीवन. तरीही समाजसेवेतून स्वतःला सावरण्याची विलक्षण ताकद दाखवली.
2015 मध्ये झारखंडच्या पहिल्या महिला आणि भारताच्या पहिल्या आदिवासी राज्यपाल!
शिक्षण व महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य.
21 जुलै 2022 भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ. पहिल्या आदिवासी, दुसऱ्या महिला राष्ट्रपती!