अनुराधा धावडे
मध्य प्रदेशच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे नाव आदराने घेतले जाते. पण त्याच्या एका सवयीमुळे त्यांना आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली
मुख्यमंत्रीपदाच्या सुरुवातीला कैलाश जोशी १८-१८ तास काम करायचे
रात्री दहा वाजता झोपायला जात आणि पहाटे चार वाजता उठून पुजापाठ करुन ते जनतेच्या सेवेत हजर होत असत
पण अचानक त्यांच्या एका विचित्र आजाराने ग्रासले, १८-१८ तास जनतेच्या सेवेत असलेले कैलाश जोशी २०-२० तास झोपू लागले
एकदा शासकीय कामासाठी त्यांना दिल्लीला जायचं होतं पण वाटेतच त्यांना खूप झोप लागली. त्यामुळे त्यांची फ्लाईटही हुकली
त्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री निवासस्थानी येऊन झोपी गेले. हळूहळू त्यांचा हा झोपण्याचा आजार वाढू लागला
त्यांची ही झोपण्याची सवय इतकी वाढली की त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला