Dwarkanath Kotnis : 'या' मराठी डॉक्टरने वाचवले होते 800 चीनी सैनिकांचे प्राण

Ganesh Sonawane

चीनची मोठी हानी

दुसऱ्या महायुद्धात 1937 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केलं होतं. त्यात चीनची चीनची प्रचंड हानी झाली होती. चीनच्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. सैन्यबळ जखमी झालं. चीनमध्ये हाहाकार उडाला होता.

Dwarkanath Kotnis | Sarkarnama

भारत धावला मदतीला

चीन कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारताचा शत्रू राहिला आहे, मात्र त्यावेळी भारत चीनच्या मदतीला धावून गेला होता.

Dwarkanath Kotnis | Sarkarnama

डॉ. द्वारकानाथ कोटणीस चीनला गेले

त्यावेळी चीनने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून भारताला पत्र पाठवलं होतं. या पत्रानंतर भारतातून पाच डॉक्टरांची टीम चीनला पाठवण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा देखील समावेश होता.

Dwarkanath Kotnis | Sarkarnama

4 वर्ष चीनमध्ये रुग्णसेवा

डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. चीनमध्ये तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली.

Dwarkanath Kotnis | Sarkarnama

800 चीनी सैनिकांचे प्राण वाचवले

डॉ. कोटणीस यांनी सलग 72 तास कोणताही ब्रेक न घेता चीनी सैन्यांची ऑपरेशन्स केली. त्यांनी या युद्धामध्ये जखमी झालेल्या तब्बल 800 चीनी सैनिकांचे प्राण वाचवले.

Dwarkanath Kotnis | Sarkarnama

चीनी लोक करतात पूजा

९ डिसेंबर १९४२ मध्ये चीनमध्येच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. कोटणीस यांना आजही चीनमध्ये देव मानलं जातं. त्यांची पूजा केली जाते.

Dwarkanath Kotnis | Sarkarnama

चीनमध्ये डॉ. कोटणीस यांचा पुतळा

चीनमधील काही शाळा आणि संग्रहालयांना देखील डॉक्टर कोटणीस यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच तिथे काही ठिकाणी त्यांचा पुतळा देखील असल्याचं पाहायला मिळतं.

Dwarkanath Kotnis | Sarkarnama

शी जिनपिंग यांनी घेतली बहिणीची भेट

२०१४ मध्ये जेव्हा शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी दिल्लीत डॉ. कोटनीस यांच्या बहिणीची भेट घेतली होती.

Dwarkanath Kotnis | Sarkarnama

टपाल तिकीटावर डॉ. कोटनीस

चीन (१९८२ आणि १९९२) आणि भारत (१९९३) या दोन्ही देशांनी टपाल तिकिटे जारी करून त्यांचा सन्मान केला आहे.

Dwarkanath Kotnis | Sarkarnama

NEXT : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये राफेल उडवणारी एकमेव 'महिला पायलट' शिवांगी सिंह कोण?

Rafale Jet Pilot Shivangi Singh | Sarkarnama
येथे क्लिक करा