Rashmi Mane
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे! अलीकडेच ईडीच्या नावाने बनावट समन्स पाठवून लोकांना फसवण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
ही बनावट समन्स खऱ्या समन्सप्रमाणेच दिसतात, त्यामुळे सामान्य नागरिकांना खरे आणि खोटे यातील फरक ओळखणे कठीण जाते.
आता ईडीने सुरू केली आहे System-Generated Summons प्रणाली. प्रत्येक समन्सवर असेल QR कोड आणि युनिक पासकोड!
समन्सवरील QR कोड स्कॅन करा
अधिकृत वेबसाइटवर जा
युनिक पासकोड टाका
समन्स खरा असल्यास अधिकारी आणि तारीख तपशील दिसतील.
वेबसाइटला भेट द्या: enforcementdirectorate.gov.in
‘Verify Your Summons’ वर क्लिक करा
समन्स क्रमांक आणि पासकोड टाका आणि पडताळणी करा.
ही पडताळणी समन्स जारी झाल्यानंतर 24 तासांनी (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळता) करता येईल.
ईडीने सांगितले की लोक “डिजिटल अरेस्ट” किंवा “ऑनलाईन अरेस्ट”च्या नावाखाली लोकांना धमकावत आहेत. पण पैशांच्या गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002) अंतर्गत असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही.
ईडीकडून अटक फक्त प्रत्यक्ष आणि कायदेशीर प्रक्रियेतूनच केली जाते. कोणत्याही ऑनलाइन लिंक, कॉल किंवा पेमेंटवर विश्वास ठेऊ नका.
अशा बनावट समन्स, कॉल्स किंवा ईमेल्सना बळी पडू नका! संशयास्पद प्रकार दिसल्यास तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती द्या. सतर्क रहा, सुरक्षित रहा!