Rashmi Mane
आज भारतीय 'शहीद पोलिस स्मृतिदिन' आहे. त्यानिमित्त शहीद पोलिस जवानांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस 'पोलिस स्मृतिदिन' म्हणून पाळण्यात येतो.
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस 'पोलिस हुतात्मा दिन' म्हणून पाळण्यात येतो.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले.
आज सकाळी नायगाव पोलिस मुख्यालयातील पोलिस स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिस अधिकारी-जवानांना या वेळी मानवंदना देण्यात आली.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस परेडसाठी उपस्थित विविध मान्यवरांची सदिच्छा भेट घेतली.
शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अभिवादन केले, सांत्वन केले. या वेळी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.