Roshan More
जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला
वारकरी संप्रदायातील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रेरणादायी ठरेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिंदे म्हणाले की, तरुण पिढीसाठी संत तुकाराम यांची गाथा ई-बुक स्वरूपात उपलब्ध करुन देण्याचे काम मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच सर्व शाळांमध्ये हे ई-बुक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
या सभारंभाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते.
जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याला उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली त्या भंडारा डोंगरावरील प्रस्तावित मंदिराच्या कामाची पाहणी केली.
वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधीला पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शासनाकडून नक्की पाठपुरावा करू , असे देखील एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.